येरी म्हणे मज काय दे
32.
येरी म्हणे मज काय देता स्वामी । उच्छिष्टाचे आम्ही धणी असो ॥१॥
तुमचे कृपेचा प्रसाद तुम्ही ठेवा । तोचि प्रियदेवा आहे आम्हा ॥२॥
येरू म्हणे घास घेई माझा करी । मूल ते निर्धारी होईल तुज ॥३॥
ऐकता आनंदे घाली लोटांगण । वंदिले चरण जीवे भावे ॥४॥
बंका म्हणे ऐस लाघव करोनी । गेलासे निघोनी चक्रपाणी ॥५॥
