घाव घालू जाता देखिले
34.
घाव घालू जाता देखिले नवल । पाहातसे खळ दुष्ठ-भावे ॥१॥
परी ते होणार कदापि चुकेना । तैसीच वासना धांव घाली ॥२॥
धाकुटी हरणी पाडसे धाकुटी । सांडी उठाउठी आली तेथे ॥३॥
पाहो जाता पाशी गुंतला तो मृग । तेव्हा काय मग केले तिने ॥४॥
मुखाप्रती मुख लाऊनि चुंबिले । ह्लदय फुटले देख-तांचि ॥५॥
सुख दु:ख बोल बोलती ते वेळे । म्हणती कपाळी भोग होता ॥६॥
सोडविता कोणी न दिसे ये काळी । काळाची पडली उडी आता ॥७॥
नामा ह्मणे खळा कळे त्याची वाणी । ऐकाया लागूनि स्थिर झाला ॥८॥
