गोपी धावुनियां धरिती
33.
गोपी धावुनियां धरिती तयातं । उगा पाहे बहते न बोले कांही ॥१॥ करिती गलबला मिळती सकळा । बोलती अबला वाईट ते ॥२॥ का रे चोरा आता कैसा सांपडलासी । म्हणोनि हातासी धरियलें ॥३॥ वोढोनियां नेती यशोदे जवळी । आहे वनमाळी कडेवरी ॥४॥ एका जनार्दनी यशोदेचे करी । उभा श्रीहरी लोणी मागे ॥५॥
