नामाचा भरंवसा मानिला
33.
नामाचा भरंवसा मानिलासे सार । उतरले पार भवनदी ॥१॥
नाम हे सोपे नाम हे सोपे । नाम हे सोपे मुखी गाता ॥२॥
नामाची आवडी सदा सर्वकाळ । नाही काळ वेळ नाम गाता ॥३॥
नामेंचि जन तरती संसारी । म्हणतसे महारी चोखियाची ॥४॥