जळा \जळी बुडबुडे देख
35.
जळा \जळी बुडबुडे देखता देखता । क्षण न लागता दिसेनाती ॥१॥
तैसा हा संसार पाहता पाहता । अंतकाळी हाता काय नाही ॥२॥
गारुड्याचा खेळ दिसे क्षणभर । तैसा हा संसार दिसे खरा ॥३॥
नामा म्हणे तेथे काही नसे बरे । क्षणाचे हे सर्व खरे आहे ॥४॥
