अवघे हरिजन मिळोनि आल
32.
अवघे हरिजन मिळोनि आले राउळा । दोन्ही कर जोडोनि विनविती गोपाळा ॥१॥
उठा पांडुरंगा हरिजना सांभाळी । पाहु द्या वदन वंदू पायांची धूळी ॥२॥
उगवला दिनकर झाल्या निवळस दिशा । कोठवरी निद्रा आता उठा परेशा ॥३॥
तुका म्हणे आम्ही उभे तिष्ठत द्वारासी । दोन्ही कर जोडोनि गाई गोपाळ सेवेसी ॥४॥
