देखिला देखिला योगिया
31.
देखिला देखिला योगियांचा रावो । रखुमादेवीनाहो पंढरीचा ॥१॥
पुंडलिकासाठी युगे अङट्डावीस । धरोनी बाळवेष भीमातटी ॥२॥
गाई गोपाळ वत्से वैष्णवांचा मेळ । नाचत गोपाळ विठ्ठल छंदे ॥३॥
चोखामेळा तेथे वंदितो चरण । घाली लोटांगण महाद्वारी ॥४॥
