उचित अनुचित आमुचे भा
11.
उचित अनुचित आमुचे भागासी । आले हृषीकेशी वाटतसे ॥१॥
तुम्हांसी विसर पडियेलासे माझा । हे तंव केशीराजा कळले मज ॥२॥
नागवे उघड़े वागविले खांदी । म्हणोनी उपाधी सांडियेली ॥३॥
कर्ममेळा म्हणे नाम है चांगले । गोडा गोडावले गोडपणे ॥४॥
