अवघी साधन हातवटी । म
12.
अवघी साधन हातवटी । मोले मिळत नाही हाटी ॥१॥
शुद्ध ज्याचा भाव झाला । दुरी नाही देव त्याला ॥२॥
कोणी कोणास शिकवावे । सार साधुनिया घ्यावे ॥३॥
लडिवाळ मुक्ताबाई । जीव मुदल ठायीचे ठायी ॥४॥
तुम्ही तरुनी विश्व तारा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥५॥
