विषयाचे सुख येथे वाट
12.
विषयाचे सुख येथे वाटे गोड । पुढे अवघड यमदंड ॥१॥
मारिती तोडिती झोडिती निष्ठूर । यमाचे किंकर बहुसाल ॥२॥
असिपत्र तरुवर खैराचे इंगळ । निघतील ज्वाळ तैलपाकी ॥३॥
तप्तभूमीवरी चालविती पायी । अग्निस्तंभ बाही कवटाळविती ॥४॥
म्हणऊनि तुका येतो काकुलती । पुरे यातायाती गर्भवास ॥४॥
