पतीतपावन नव्हेसि म्ह
12.
पतीतपावन नव्हेसि म्हणुनी जातो माघारा ॥१॥
घ्यावे तेव्हा द्यावे ऐसा आससी उदार ।
काय धरुनि देवा तुझे कृपणाचे द्वार ॥२॥
सोडी ब्रीद देवो आता नव्हेसि अभिमानी ।
पतीतपावन नाम तुझे ठेवियले कोणी ॥३॥
झेंगट घेऊनी हाती दवंडी पिटीन तिही लोकी ।
पतीतपावन देवो परी तू मोठा घातकी ॥४॥
नामा म्हणे देवो तुझे न लगे मज काही ।
प्रेम असो दे चित्ती म्हणुनी लागतसे पायी ॥५॥
