वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › २. बाळक्रीडा स्तुती

न वर्णवे जन्ममरणाचे

🙏 4. संत नामदेव · ABH-083490 · अभंग क्र. १२

12.
न वर्णवे जन्ममरणाचे दु:ख । दावी आता मुख पांडुरंगा ॥१॥
कुरळिया केश भाळी शोभे टिळक । दावी आता मुख पांडुरंगा ॥२॥
भोवया व्यंकटा शोभती सुरेख । दावी आता मुख पांडुरंगा ॥३॥
कमलाकार नेत्र सुंदर नासीक । दावी आता मुख पांडुरंगा ॥४॥
कर्णींची कुंडले न वर्णवे हाटक । दावी आता मुख पांडुरंगा ॥५॥
आधार आरक्त दंत इंदुहूनि अधिक । दावी आता मुख पांडुरंगा ॥६॥
विष्णुदास नामा तुझेंचि बाळक । दावी आता मुख पांडुरंगा ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग