॥ अभंग ११ ॥
11.
॥ अभंग ११ ॥
काया वाचा मन एकविध करी ।
एक देह धरी नित्य सुख ॥ १ ॥
अनेकत्व सांडीं अनेकत्व सांडी ।
आहे ते ब्रह्मांडी रूप तुझे ॥ २ ॥
निर्वासना बुद्धि असता एकपणे ।
सहज भोगणें ऐक्य राज्य ॥ ३ ॥
म्हणे गोरा कुंभार नाही रूप रेख ।
तेंचि तुझे सुख नामदेवा ॥ ४ ॥
