आवडीचे प्रेम नामया ल
11.
आवडीचे प्रेम नामया लागले । ते आम्हा फावले जन्मोजन्मी ॥१॥
म्हणोनी पंढरी विटेवरी हरी । भिवरेचे तीरी कर कटी ॥२॥
महा पातकियासी दर्शने उद्धार । ऐसा दिला वर पुंडलिका ॥३॥
अठ्ठावीस युगे न बैसे खाली । समचि पाउली उभा असे ॥४॥
चोखा म्हणे ऐसा भक्तांचा आळुका । कनवाळु देखा भाविकांचा ॥५॥
