वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

सर्व काम धन सर्व सिध

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090038 · अभंग क्र. १२

12.
सर्व काम धन सर्व सिध्दि पूर्ण । पतित पावन हरि एक ॥१॥
ते रुप पंढरी पुंडलिका वोळले । आणूनि ठेविले भीमातीरी ॥२॥
न लगती त्या सिध्दि करणे उपाधी । नित्य चित्त शुध्दि विठ्ठलनामे ॥३॥
कळिकाळासी त्रास चित्ती हृषिकेश । उगवला दिवस सोनियाचा ॥४॥
त्रिभुवनी थोर क्षेत्र पै सार । विठ्ठल उच्चार भीमातीरी ॥५॥
निवृत्ति तत्पर निवाला सत्वर । नित्यता आचार विष्णुमय ॥६॥

अर्थ:
ह्या विठ्ठल स्वरुपात सर्व धन व सिध्दि असुन ह्यांचा मुळे पतित ही पावन होतो. ते परब्रह्म सगुण रुपात पुंडलिकांने भीमातीरी उभे केले. आता अनेक इतर साधन न करता त्या विठ्ठलनामामुळे चित्त शुध्द होते. चित्तत जर विठ्ठल धारण केला तर कळीकाळास धाक होतो असा सोन्याचा दिवस भक्तास प्राप्त होतो. विठ्ठल नामाच्या गजर भीमातीरी झाल्यामुळे ते तीर्थ सर्व त्रिभुवनात श्रेष्ट ठरते. निवृतिनाथ म्हणतात हे जगत विष्णुस्वरुप आहे ह्या त्यांच्या अनुभवामुळे त्यांना शांती मिळाली आहे.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग