नामाचिया बळे न भिऊं
11.
नामाचिया बळे न भिऊं सर्वथा ।
कळिकाळाच्या माथा सोटे मारू ॥१॥
वैकुंठींचा देव आणू या कीर्तनी ।
विठ्ठल गाऊनी नाचो रंगी ॥२॥
सुखाचा सोहळा करूनी दिवाळी ।
प्रेमे वनमाळी चित्ती धरूं ॥३॥
सांवता म्हणे ऐसा भक्ति-मार्ग धरा ।
तेणे मुक्ति द्वारा वोळंगती ॥४॥
