न कळे वो माव आगमा नि
11.
न कळे वो माव आगमा निगमा । जयाचा महिमा श्रुति शास्त्रा ॥१॥
तो म्या डोळे भरी पाहिला श्रीहरी । भीवरेची तीरी विठ्ठलरूप ॥२॥
सुखाचा सागर भक्तांचा कैवारी । ब्रीद चराचरी गाजतसे ॥३॥
बंका म्हणे ऐसा जयाचा महिमा । सुलभ तो आम्हा भाविकांसी ॥४॥
