कुंचे पताकांचे भार ।
13.
कुंचे पताकांचे भार । आंले वैष्णव डिंगर ।
भेणे पळती यमाकिंकर । नामे अंबर गर्जतसे ॥१॥
आले हरिदासांचे थाट । कळिकाळा नाही वाट ।
विठ्ठलनामे करिती बोभाट । भक्ता वाट सांपडली ॥२॥
टाळ घोळ चिपळिया नाद । दिंडी पताका मकरंद ।
नाना बागडियाचे छंद । कवच अभेद नामाचे ॥३॥
वैष्णव चालिले गर्जत । महावीर ते अदूभुत ।
पुढे यमदूत पळत । पुरला अंत महादोषा ॥४॥
निवृत्ति संत हा सोपान । महावैष्णव कठीण ।
मुक्ताबाई तेथे आपण । नारायण जपतसे ॥५॥
ज्ञानदेव वैष्णव मोठा । विठ्ठनामे मुक्तपेठा ।
स्नान दान घडे श्रेष्ठा । वैकुंठवाटा संत गेले ॥६॥
