वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 9. देव जन्माचे अभंग › 1. श्री राम जन्माचे अभंग

श्रीरामाची आरती १

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073313 · अभंग क्र. १२

12.
श्रीरामाची आरती १
जय देव जय देव निजबोधा रामा ।
परमार्थे आरती, सद्भावे आरती, परिपूर्णकामा ।। धृ ।।

स्वस्वरूपोन्मुखबुद्धि वैदेही नेली ।
देहात्मकाभिमाने दशग्रीवे हरिली ।
शब्दरूप मारुतीने सच्छुद्धि आणिली ।
तव चरणांबुजी येऊन वार्ता श्रृत केली ।
जय देव जय देव निजबोधा रामा ।।१।।

उत्कट साधुनी शिळा सेतू बांधोनी ।
लिंगदेह लंकापुरी विध्वंसूनी ।
कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।
देह अहंभाव रावण निवटोनी ।।२।।

प्रथम सीताशोधा हनुमंत गेला ।
लंका दहन करुनी अखया मारिला ।
मारिला जंबुमाळी भुवनी त्राहाटिला ।
आनंदाची गुढी घेऊनिया आला ।।३।।

निजबळे निजशक्ति सोडविली सीता ।
म्हणुनी येणे झाले अयोध्ये रघुनाथा ।
आनंदे ओसंडे वैराग्य भरता ।
आरती घेऊनी आली कौसल्यामाता ।।४।।

अनाहतध्वनि गर्जती अपार ।
अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ।
अयोध्येसी आले दशरथकुमार ।
नगरी होत आहे आनंद थोर ।।५।।

सहजसिंहासनी राजा रघुवीर ।
सोऽहंभावे तया पूजा उपचार ।
सहजांची आरती वाद्यांचा गजर ।
माधवदास स्वामी आठव ना विसर ।।६।।

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग