आम्ही नामाचे धारण ।
12.
आम्ही नामाचे धारण । नेणो प्रकार आणिक ।
सर्वभावे एक । विठ्ठलाचि प्रमाण ॥१॥
नलगे जाणावे नेणावे । गावे आनंदे नाचावे ।
प्रेम सुख घ्यावे । वैष्णावांचे सगंती ॥२॥
भावबळे घालू कास । लज्जा चिंता दवडू आस ।
पायी निजध्यास । म्हणवू दास विष्णुचे ॥३॥
भय नाही जन्म घेता । मोक्षसुख हाणो लाता ।
तुका म्हणे सत्ता । करु निकट सेवेची ॥४॥
