उतरले सुख चंद्रभागे
12.
उतरले सुख चंद्रभागे तटी । पाहा वाळुवंटी बाळरूप ॥१॥
बहुता काळाचे ठेवणे योगियांचे । ध्येय शंकराचे सुख ब्रह्म ॥२॥
जयालागी अहोरात्र विवादती । तो भक्ताचिये प्रीती उभा असे ॥३॥
चोखा म्हणे सर्व सुखांचे आगर । न कळे ज्याचा पार श्रुति-शास्त्रा ॥४॥
