वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 12. संत सेना न्हावी › 1. संत सेनान्हावींचा अभंग गाथा › 1. संत सेनान्हावि संपूर्ण अभंग गाथा एकूण अभंग 143 › 11. न्हावी वंश धारकास आज्ञा

न्हावी वंश धारकास आज

🙏 12. संत सेना न्हावी · ABH-073755 · अभंग क्र. ११

११.
न्हावी वंश धारकास आज्ञा

४०.
जे म्हणविती न्हावियाचे वंशीं । तेणें पाळावें स्वधर्मासी ॥१॥
येर अवघे बटकीचे । नव्हे न्हावियाचे वंशीचे ॥२॥
शास्त्रें नेम नेमियला । सांडोनि अनाचार केला ॥३॥
जन्मलों ज्या वंशांत । धंदा दोन प्रहर नेमस्त ॥४॥
सत्य पाळारे स्वधर्मासी । सेन म्हणे आज्ञा ऐसी ॥५॥

४१.
न्हावीयाचे वंशीं । जन्म दिला ऋषीकेशी ।
प्रतिपाळावें धर्मासी । व्यवहारासी न सांडी ॥१॥
ऐका स्वधर्मविचारी ।धंदा करी दोन प्रहर ।
सांगितले साचार । पुरणांतरीं ऐसे हें ॥२॥
करूनियां स्नान । मुखी जपे नारायण ।
मागुती न जाण । शिवू नये धोकटी ॥३॥
ऐसे जे का न मानिती । ते जातील नरकाप्रती ।
सकळ पूर्वज बुडविती । शास्त्रसंमती ऐसी हे ॥४॥
शिरी पाळावें आज्ञेसी । शरण जावे विठोबासी ।
सेना म्हणे त्यासी । ऋषीकेशी सांभाळी ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग