वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 10. निवडक अभंग › 3. संत नामदेव निवडक अभंग

उदाराचा राणा म्हणविस

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-072491 · अभंग क्र. १३

13.
उदाराचा राणा म्हणविसी आपणा । सांग त्वा कवणा काय दिले ॥१॥
उचिता उचिता देसी पंढरीनाथा । न बोलो सर्वथा वर्मे तुझी ॥२॥
वर्मे तुझी काही बोलेन मी आता । क्षमा पंढरीनाथा करी बापा ॥३॥
न घेता न देसी आपुलेंहि कोणा । प्रौढी नारायणा न बोलावी ॥४॥
बाळमित्र सुदामा विपत्ती पिडला । भेटावया आला तुजलागी ॥५॥
तीन मुष्टि पोह्यांसाठी मन केले हळुवट । मग तया उत्कृष्ट राज्य दिले ॥६॥
छळावया पांडव दुर्वास पातला । दौपदीने केला धांवा तुझा ॥७॥
येवढिया आकांती घेऊनि भाजीपान । मग दिले अन्न ऋषिलागी ॥८॥
बिभीषणा दिधले सुवर्णाची नगरी । ही कीर्ति तुझी हरी वाखाणिती ॥९॥
वैरियाचे घर भेदे त्वा घेतले । त्याचे त्यासी दिधले नवल काय ॥१०॥
धृव आणि प्रल्हाद अंबऋषि नारद । हरिश्र्चंद रुक्मांगद आदि करुनी ॥११॥
त्याचे सेवाऋण घेऊनी अपार । मग त्या देशी वर अनिर्वाच्य ॥१२॥
एकाचि शरीरसंपत्ति आणि वित्त । एकाचे ते चित्त हिरोनी घेसी ॥१३॥
मग तया देशी आपुले तु पद । जगदानी हे ब्रीद मिरविशी ॥१४॥
माझे सर्वस्व तू घेई । तुझे नको काही । मनोरथाची नाही चाड मज ॥१५॥
नामा म्हणे केशवा जन्मजन्मांतरी । करीन मी हरी सेवा ऋण ॥१६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग