माझे माहेर पंढरी । आ
13.
माझे माहेर पंढरी । आहे भीवरेचे तीरी ॥१॥
बाप आणि आई । माझी विठ्ठल रखुमाई ॥२॥
पुंडलिक बंधु आहे । त्याची ख्याती सांगू काये ॥३॥
माझी बहीण चंद्रभागा । करितसे पापभंगा ॥४॥
एका जनार्दनी शरण । करी माहेरींची आठवण ॥५॥