भानुदासाचे कुळी महाव
11.
भानुदासाचे कुळी महाविष्णुचा अवतार ।
आदी क्षेत्री स्थान वस्ती गोदातीर ॥१॥
ओवाळु आरती स्वामी एकनाथा ।
तुमचे नाम घेता हरे भवभ्य चिंता ॥२॥
जनार्दनाची कृपा दत्तात्रयाचा प्रसाद ।
भागवती टीका नारायण आत्मबोध ॥३॥
ब्रहमाविष्णु महेश ज्यासी छळावया येती ।
न ढळे ज्याची निष्ठा होसी एकात्मता भक्ति ॥४॥
कावडीने पाणी ज्याघरी चक्रपाणि वाहे ।
अनन्य भक्तिभावे निळा वंदी त्याचे पाय ॥५॥
