मंगल, मंगल नाम विठोब
12.
मंगल, मंगल नाम विठोबाचें ।
उच्चारिता जन्म खंडे ॥१॥
सुलभ, दुर्लभ ब्रह्मादिका वंद्य ।
वेदादिक शुद्ध गाती जया ॥२॥
सांवता म्हणे सर्व सुखाचे आगर ।
रुक्मादेवी – वर विटेवरी ॥३॥
12.
मंगल, मंगल नाम विठोबाचें ।
उच्चारिता जन्म खंडे ॥१॥
सुलभ, दुर्लभ ब्रह्मादिका वंद्य ।
वेदादिक शुद्ध गाती जया ॥२॥
सांवता म्हणे सर्व सुखाचे आगर ।
रुक्मादेवी – वर विटेवरी ॥३॥