वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 7. संत निवृत्तीनाथ › 1. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा › १. संत निवृत्तीनाथ सार्थ अभंग गाथा २२४ › १. संत निवृत्तीनाथ सार्थ गाथा

प्रारब्ध संचित विठ्ठ

🙏 7. संत निवृत्तीनाथ · ABH-090027 · अभंग क्र. ११

11.
प्रारब्ध संचित विठ्ठल दैवत । कुळी उगवत भाग्य योगे ॥१॥
जे रुप पंढरी उभे असे साने । त्रिभुवन ध्याने वेधियेले ॥२॥
उगवती ज्योती प्रभा पै फाकती । नाही दिन राती पंढरीये ॥३॥
प्रभात हारपे सायंकाळ लोपे । दिननिशी लोपे विठ्ठल प्रभा ॥४॥
पृथ्वि हे ढिसाळ वायु व्योम फळ । सेविती अढळ जोडती रया ॥५॥
निवृत्ति सप्रेम जोडती सर्वकाळ । पंढरीये राम विश्रामले ॥६॥

अर्थ:
अनेक जन्माच्या संचित व प्रारब्धामुळे भाग्य योगाने श्री विठ्ठल भक्ताच्या कुळात जन्म मिळतो.सगुण रुपाने पंढरीत साकार झालेल्या रुपाने त्रिभुवनाचे ध्यान वेधले आहे. ह्या आत्मज्योतीच्या तेजप्रभेमुळे दिनरात्रीचे भास पंढरीत होत नाहीत.ह्या विठ्ठलाच्या प्रभेमुळे सकाळ संध्याकाळ लोप पावतात. श्री विठ्ठलाच्या सेवे मुळे पृथ्वीचे जडपण वायु चे विचरण व आभाळाचा आभास स्थिरावतो. येथेच प्रभु श्रीरामाने येऊन समाधीरुपाने विश्रांती घेतली तो श्रीराम मला प्राप्त झाला असे निवृत्तिनाथ म्हणतात.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग