मन मुरडुनी घातले मना
12.
मन मुरडुनी घातले मनाते । थोरु मारु तेथे होत असे ॥१॥
पुरे पुरे वो आता जिणे ते केऊते ।
येणे वो पंढरीनाथे वेधियेले ॥२॥
न चले न चले काही करणे कामान ।
यांचे पहाणेची विंदान कामानिया ॥३॥
बाप रखुमादेविवरा विठ्ठलासी भेटी ।
संसारासी तुटी झाली गे माये ॥४॥
