नाही त्या उरले दुजे
12.
नाही त्या उरले दुजे कृष्णविण।
ब्राह्य अंत:करण कृष्ण झाला ॥१॥
जीवाचाही जिव शिवाचाही शिव।
देही देहभाव कृष्ण झाला ॥२॥
शब्दा शब्दविता बोधा बोधविता।
चित्ता चेतविता झाला कृष्ण ॥३॥
निळा म्हणे कृष्णे केले कृष्णाकार।
सबाह्य अंतर रंगविले ॥४॥
