सत्य ज्योतिर्लिंग बा
12.
सत्य ज्योतिर्लिंग बारा । प्रात:काळी स्मरण करा ।
कोटी कुळे उद्धारा । भव तरा बापहो ॥१॥
वाराणशी विश्वनाथ । मोक्ष दाता तो समर्थ ।
पुरवील अंतरीचे आर्त । सोमनाथ सोरटी ॥२॥
ॐकार ममलेश्वर । श्वेतबंध रामेश्वर ।
भीमा उगमी भीमाशंकर । घृष्णेश्वर वेराळी ॥३॥
नागनाथ अमृतोदकी । विश्वजन केले सुखी ।
परळी वैजनाथ सुखी । सुकृत जन्माचे ॥४॥
त्र्यंबक हा तीर्थराज । पुरवील अंतरीचे काज ।
त्याही तेजामाजी तेज महाकाळ उज्जनी ॥५॥
दुजे कैलास भुवन श्रीशैल्य मल्लकार्जुन ।
वाचे स्मरता धन्य धन्य । अनुपम्य क्षेत्र ते ॥६॥
ब्रदिकेदार उत्तरे । ज्याचे स्मरणे भाव हा तरे ।
ध्यान धरिता वृत्ती नुरे । निज निश्चळ दासाची ॥७॥
नरहरी म्हणे जन्मा यावे । शुध्द सत्व प्रेम भावे ।
वाचे हरी गुण गावे । मालो लपे सर्वदा ॥८॥
