वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 4. बुधवारचे अभंग

जै (जरी) आकाश वर पडो

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073651 · अभंग क्र. १२

12.
जै (जरी) आकाश वर पडो पाहे । ब्रम्हागोळ भंगा जाये ।
वडवानळ त्रिभुवन खाये । तरी तुझीच वाट पाहे गा विठोबा ॥१॥
न करी आणिकांचा पांगिला । नामधारक तुझाचि अंकिला ॥धृ॥
सप्त सागर एकवट होती । जै हे विरुनी जाय क्षिती ।
पंचमहाभुते प्रलय पावती । परि मी तुझाचि सांगाती गा विठोबा ॥२॥
भलतैसे वरपडो भारी । नाम न संडो टळो निर्धारी ।
जैसी पतिव्रता प्राणेश्वरी । विनवी भानुदास म्हणे अवधारी गा विठोबा ॥३॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग