वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 1. भजनी मालिका 2026 › 1. वारकरी भजनी मालिका › 7. वाराचे अभंग › 5. गुरुवारचे अभंग

ज्ञानदेव चतुराक्षरी

🙏 1. भजनी मालिका 2026 · ABH-073721 · अभंग क्र. ११

11.
ज्ञानदेव चतुराक्षरी जप हा करी तू सर्वज्ञा । ज्ञानाज्ञान विरहिता ब्रम्ह प्राप्तीची संज्ञा ।
ज्ञाता ज्ञेय निजांग होय ऐसी प्रतिज्ञा । ज्ञानाग्निने पापे जळती ही ज्याची आज्ञा ॥१॥
ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो । वासुदेवचि होतो अखंड वदनी वदे तो ॥धृ॥
नररुपे विष्णु अवतरला हा भगवान । नदि नद वापी कूप पाहता उदक नोहे भिन्न ।
नवल हेचि पशु म्हैसा करितो वेदाध्यन । नमन करुनि सद्भावे जपता होय विज्ञान ॥२॥
देवाधिदेव भगवान भक्तांप्रती वर दे । देता वर ब्रम्हांडी ब्रम्हानंद कोदे ।
देशिकराज दयानिधी अलंकापुरी जो नांदे । देशभाषा ज्ञानदेवी गीतार्थ वदे ॥३॥
वक्ते श्रोते ग्रंथपठणे पावती समभाव । वर्णू जाता अघटित महिमा होतो जीव शीव ।
वंदूनि अनन्य एका जनार्दनी धरी दृढ भाव । वर्षती निर्झर ज्ञानदेव नामे पुष्पांचा वर्षाव ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग