वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 3. संत तुकाराम › 1. संत तुकाराम सार्थ गाथा › २. सार्थ अभंग गाथा › ३. सार्थ अभंग १००१ ते १५००

होईल जाला अंगे देव ज

🙏 3. संत तुकाराम · ABH-078910 · अभंग क्र. ११५८

1158.
होईल जाला अंगे देव जो आपण । तयासी हे जन अवघे देव ॥१॥
येरांनी सांगावी रेमट काहाणी । चित्ता रंजवणी करावया ॥धृपद॥
धाला आणिकाची नेणे तहान भूक । सुखे पाहे सुख आपुलिया ॥२॥
तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव । शब्दाचे गौरव कामा नये ॥३॥

अर्थ :
हरी आणि गुरुच्या कृपेने ज्याला देव प्राप्त झाला असेल त्याला सर्वत्र देवाची प्रचिती येते. यावाचून इतर रेमट कथा करणाऱ्या लोकांनी लोकांच्या मनाचे मनोरंजन करण्याकरिता कोणतेही रमेट कथा करत बसाव्यात. जो पोट भरून जेवतो त्याला इतरांची तहानभूक कळत नाही त्याप्रमाणे जो देवरूप झालेला असतो तोच सर्वत्र सुख पाहतो. तुकाराम महाराज म्हणतात येथे प्रत्यक्ष अनुभव पाहिजे नुसताच शब्द ज्ञानचा वापर करण्यातअर्थ : नाही तो कामी येत नाही.

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग