पुंडलिके धरिला चांगो
1166.
पुंडलिके धरिला चांगोबाचा हात | तंव सकळ संत कळवळंती ॥१॥
पताकांचे भार समाधि भोंवते | तेव्हा साधुसंत उठावले ॥२॥
यांच्या या ज्ञानाचा अंतपार नाही | भली मुक्ताई ओसंडली ॥३॥
संतसमागम फळला तुजला | एकांत फावला मुक्ताई ॥४॥
मसुरेप्रमाणे दावियेली खूण | तेंचि पूर्ण ब्रह्म योगियाचे ॥५॥
फार दिवस तुम्ही रक्षिले शरीर | मुक्ताईने पार उतरिले ॥६॥
नामा म्हणे देवा सद्गुरूचा महिमा | वाप पूर्ण आम्हा पांडुरंग ॥७॥
