लाभ अथवा हानी करिता
1146.
लाभ अथवा हानी करिता व्यवसाय ।
आम्हा कते विपाय फळा आले ॥१॥
एका लाभा पात्र केले तिही लोकी ।
आम्हा नेलेंशेखी ऐशा थरा ॥२॥
फजितीसी उणे नाही लोकामाजी ।
अंतरविले काजी संसारिका ॥३॥
नव्हता कळो आला निश्च्याचा भावो ।
येणे काळे देवो निष्ठुरसा ॥४॥
गेले होऊनिया न चले या युक्ति ।
होणार ते गती हो का सुखे ॥५॥
निळा म्हणे लाजे झाली प्राणसंधी ।
न ये करुणानिधी कृपा तुम्हा ॥६॥
