लाविली कौपीन पितांबर
1165.
लाविली कौपीन पितांबरी एक | त्यागिली अनेक महत् माया ॥१॥
सव्य हाते घेतले संतसाधुजना | केली प्रदक्षिणा समाधीसी ॥२॥
समाधीचे पाळी निवृत्ती वनमाळी | अंतरी कळवळी मुक्ताबाई ॥३॥
|आणिकांच्या डोळा अश्रुपात येत | होईल की गुप्त योगिराज ॥४॥
॥चांगदेवा दिधली विठोबाची पाऊले | तीर्थ ते घेतले देवगुरूचे ॥५॥
नामा म्हणे हरि जाली आळवण | करा बोळवण चांगोबाची ॥६॥
