वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 155. चांगदेव महाराज समाधी

मुक्‍ताईने चांगा घेत

🙏 4. संत नामदेव · ABH-081688 · अभंग क्र. ११६३

1163.
मुक्‍ताईने चांगा घेतलासे पोटा | उठा आता भेटा लहान थोर ॥१॥
भेटले ऋषीवर वैष्णव सकळी | बैसले ते पाळी समाधीच्या ॥२॥
निवृत्ति मुक्ताईसी केला नमस्कार | उतरिले पार भवसिंधू ॥३॥
विठ्ठल रखुमाईसी केली प्रदक्षिणा | मग शुद्ध नमना आरंभिले ॥४॥
नामा म्हणे देवा निवृत्ति मुक्ताई | चांगा लागे पायी जाऊनिया ॥५॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग