वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 65. नाममहिमा - अभंग ११६२ ते १२७२

नामाचा धारक । हरिहरा

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086536 · अभंग क्र. ११६७

1167.
नामाचा धारक । हरिहरा त्याचा धाक ॥१॥
ऐसे नाम समर्थ । त्रिभुवनी ते विख्यात ॥२॥
नामे यज्ञयाम घडती । नामे उत्तम लोकी गती ॥३॥
नामे भुक्ति मुक्ति तिष्ठें । नामे वरिष्ठा वरिष्ठें ॥४॥
नामे सर्व सत्ता हाती । नामे वैकुंठीं वसती ॥५॥
नामे होती चतुर्भूज । एका जनार्दनी सतेज ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग