वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 155. चांगदेव महाराज समाधी

निवृत्ति मुक्ताई गोव

🙏 4. संत नामदेव · ABH-081672 · अभंग क्र. ११५८

1158.
निवृत्ति मुक्ताई गोविद गोपाळ | उठले सकळ स्नानालागी ॥१॥
राही रखमाई सहसमुदायेसी | मुनि आणि ऋषि उठावले ॥२॥
करूनिया स्नाने तिघाले सकळ | नाचती गोपाळ गोदातीरी ॥३॥
चांगदेवे सोवळे होऊनिया त्वरे | देव ऋषीश्वर पूजियेले ॥४॥
धत्य गोदातीर आदि हे अनादि | उरकिली समाधि यथासांग ॥५॥
नामयाचे पुत्र नारा विठा गोंदा | जागा झाडी महादा समाधीची ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग