देव म्हणे भक्तराजा ।
1162.
देव म्हणे भक्तराजा ।
अव्हेर माझा न करावा ॥१॥
भोजनकाळी पाचारावे ।
मजही घ्यावे सांगाते ॥२॥
भोजनी तुमच्या तृप्ती मज ।
काजे काज तुमचिया ॥३॥
निळा म्हणे अंतर नका ।
असो एकएका माझारी ॥४॥
1162.
देव म्हणे भक्तराजा ।
अव्हेर माझा न करावा ॥१॥
भोजनकाळी पाचारावे ।
मजही घ्यावे सांगाते ॥२॥
भोजनी तुमच्या तृप्ती मज ।
काजे काज तुमचिया ॥३॥
निळा म्हणे अंतर नका ।
असो एकएका माझारी ॥४॥