वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 155. चांगदेव महाराज समाधी

श्री चांगदेव महाराजा

🙏 4. संत नामदेव · ABH-081676 · अभंग क्र. ११४७

1147.
श्री चांगदेव महाराजांची समाधी

निवृत्तिदेवा योग्य गगेचे ते स्नान | करू अवघेजण आवडीने ॥१॥
तीर्थयात्रा होईल देवसमागमे | केवढा महिमा रामे सांगितला ॥२॥
मार्गी चालताती भक्त आणि हरी | आले भुलेश्वरी अवघेजण ॥३॥
भुलेश्वरालागी पूजा केली सांग | भक्‍त पांडुरंगे तीन रात्री ॥४॥
तेथून वैष्णव चालियेले हरी | आले सिद्धेश्वरी देवभक्त ॥५॥
|पाराशर ऋषींचे स्थळ पुरातन | राहिले तारायण पंचरात्र ॥६॥
सामा म्हणे देवा भावे कपिलेश्वरा | आनंद ऋषीवरा जाला फार ॥७॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग