चिंतने कंसासुर तरला
1146.
चिंतने कंसासुर तरला । चिंतने पूतनेचा उद्धार केला । चिंतने आनंद जाहला । अर्जुनादिकांसी ॥१॥
म्हणोनी करावे चिंतन । काया वाचा आणि मन । संतांचे चरण । नित्य काळ चिंतावें ॥२॥
चिंतन आअनीं शयनी । भोजनी आणि गमनागमनीं । सर्वकाळ निजध्यानीं । चिंतन रामकृष्णाचे ॥३॥
चिंतन हेंची तप थोरा । चिंतनें साधे सर्व संसार । एका जनार्दनी निर्धार । नामस्मरण चिंतन ॥४॥
