वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 155. चांगदेव महाराज समाधी

चालिले घेऊनि देव ऋषी

🙏 4. संत नामदेव · ABH-081685 · अभंग क्र. ११४९

1149.
चालिले घेऊनि देव ऋषीवरा | आवघिया पुढारा गरुडदेव ॥१॥
दिवसानुदिवस चालिले सत्वर | पहावे गोंदातीर म्हणोनिया ॥२॥
धन्य गोंदातीर धन्य कचेश्वर | जाती ऋषीवर स्नानालागी ॥३॥
सारा पौष मास गेला कचेश्वरी | नित्य गंगातीरी स्नानसंध्या ॥४॥
पाहिला कचेश्वर पाहिली ती गोदा | आली प्रतिपदा माघमास ॥५॥
नामा म्हणे देवा जावे पुण्यस्तंभा | मनोहर जागा सिद्धेश्वर ॥६॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग