ऐकोनि संत हासतील ।
1160.
ऐकोनि संत हासतील ।
तुम्हासी येईल मग लाज ॥१॥
कौल दिला राहे सुखे ।
न म्हणो मुखे दे ऐसे ॥२॥
मागावे ते आम्हाचि जवळी ।
आहे नामावळी पढो सुखे ॥३॥
आणिखी तुमची नाही आशा ।
ठेवा कैशा मुक्तिहि त्या ॥४॥
निळा म्हणे आपुल्याचि सुखे ।
असो हरिखे अखंडित ॥५॥
