चिंतनें बळिद्वारें ब
1149.
चिंतनें बळिद्वारें बंधन । चिंतने ह्य समाधान । न म्हणे उच्छिष्ट अथवा पुर्ण । चिंतनेंची मुख पसरी ॥१॥
चिंतनें भोळे भाविक जन । तयाचे वारी नाना विघ्न । धर्माघरीं उच्छिष्ट जाण । चिंतनसाठी काढितसे ॥२॥
चिंतनासाठीं सारथी जाहला । चिंतनासाठी उभा ठेला । चिंतनेची गोविला । पुंडलिकें अद्यापी ॥३॥
चिंतनें उभा विटेवरी । न बैसे अद्यापि वरी । एका जनार्दनी निर्धारी । चिंतन सोपे सर्वांत ॥४॥
