वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 64. चिंतनमहिमा - अभंग ११४५ ते ११६

चिंतन ते सोपे जगी ।

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085585 · अभंग क्र. ११४८

1148.
चिंतन ते सोपे जगी । रामकृष्ण म्हणा सत्संगी । उणें पडॊं नेदी व्यंगीं । देव धांवे चिंतनें ॥१॥
चिंतन करिता द्रौपदीं । पावलासें भलते संधी । ऋषिश्वरांची मांदी । तृप्त केली क्षणमात्रें ॥२॥
चिंतने रक्षिलें अर्जुना । लागों नेदी शक्तिबाणा । होऊनी अंकणा । रथारूढ बैसला ॥३॥
चिंतनें प्रल्हाद तारिला । जळीं स्थळीं सांभाळिला । एका जनार्दनी भला । चिंतनाचा अंकित ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग