हरिपाठ गजरे केला जयज
1157.
हरिपाठ गजरे केला जयजयकार | उठावले भार वैष्णवांचे ॥१॥
टाळ मृदंग वाजती अपार | मिरविती भार वैष्णवांचे ॥२॥
दोही बाही उभे पताकांचे भार | मध्ये मनोहर गौतमी ते ॥३॥
विसोबा खेचरे पुंडलिका हाते | आणिले साहित्य समाधीचे ॥४॥
नामा म्हणे हरि चांगदेवा स्नान | घाली आवडीने प्रेमयुक्त ॥५॥
