नामे आळविता आठी ।
1159.
नामे आळविता आठी ।
तुम्हा पोटी भय वाटे ॥१॥
नेणो काही मागतील ।
किंवा येतील वैकुंठा ॥२॥
काय वाटू किती देऊ ।
म्हणोनिया जिऊ निर्बुजला ॥३॥
ऐसे जाणोनी लपालेती ।
घेतले चित्ती भय वाटे ॥४॥
याचि लागी उत्तर न दया ।
कळले गोविंदा मनोगत ॥५॥
निळा म्हणे सुखी असा ।
न मागो सहसा आण तुमची ॥६॥
