चिंतने बिभीषण मुक्त
1156.
चिंतने बिभीषण मुक्त । चिंतने जाहला जनक जीवमुक्त । चिंतनें कुळ सरित । सर्वेभावे हरि होय ॥१॥
आवडी चिंतावे चरण । दुजेंनको मानधन । नाम स्मरणावांचुन । चिंतनचि नसो ॥२॥
ऐसा एकविध भावे । चिंतन असो मनी जीवे । एका जनार्दनी देव । तया पाठी धांवतसे ॥३॥
