नाना दु:ख माया आठवती
1154.
नाना दु:ख माया आठवती मना | आता नारायणा कृपा करी ॥१॥
माझ्या पातकांचा लागू नेदी अंत | ऐसे माझे चित्त साक्ष असे ॥२॥
ज्ञानाग्नि माझी करा तृणवत | होऊनि कृपावंत श्रीहरी ॥३॥
योगिराज यासी नाही पापदोष | केला उपदेश मुक्ताईने ॥४॥
नामा म्हणे देवा पेटले अंतर | करा आता स्थिर योगिराज ॥५॥
